AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खुशखबर! एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ११वा हप्ता जमा होणार!
कृषी वार्ता एबीपी माझा
खुशखबर! एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ११वा हप्ता जमा होणार!
➡️ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकार छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहे. होळीनंतर, सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांचा ११वा हप्ता हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. ➡️ एप्रिल ते जुलै या महिन्यांसाठीचा ११ वा हप्ता असणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता हस्तांतरित केला जाऊ शकतो. पीएम किसान योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी आवश्यक आहे. शेतकरी पर्यायामध्ये, आधार आधारित ओटीपी पडताळणीसाठी ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा आणि बायोमेट्रिक पडताळणीसाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधा. ➡️ जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांनी पीएम किसान खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक अजून लिंक केला नसेल, तर तुम्ही तसे करू शकता. ➡️ पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली फार्मर कॉर्नर असा ऑप्शन येईल. फार्मर कॉर्नर मध्ये बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवर जा.त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता. खात्यावर पैसै जमा झाले नाहीत तर येथे करा तक्रार पीएम किसान टोल फ्री नंबर : १८००११५५२६६ पीएम किसान हेल्पलाइन नंबर : १५५२६१ पीएम किसान लैंडलाइन नंबर : ०११—२३३८१०९२, २३३८२४०१ पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : ०११-२४३००६०६ पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : ०१२०-६०२५१०९ ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in संदर्भ:- एबीपी माझा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
59
7
इतर लेख