एलपीजी ग्राहकांना दिलासा,डिसेंबर मध्ये एलपीजी अनुदान!
कृषि वार्ताकृषी जागरण
एलपीजी ग्राहकांना दिलासा,डिसेंबर मध्ये एलपीजी अनुदान!
➡️तेल विपणन कंपन्यांनी डिसेंबर महिन्यासाठी देशांतर्गत एलपीजी दर जाहीर केला आहे. ➡️जुलै ते नोव्हेंबर या काळात अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. ➡️या महिन्यात आयओसीने अनुदानाशिवाय १४.२ किलो सिलिंडरची किंमत ५९४ रुपयांवरून ६४४ रुपयांवर आणली आहे, तर ग्राहकांना या वर्षाच्या मे महिन्यापासून अनुदान मिळत नाही. ➡️वास्तविक यावर्षी मे महिन्यापासून अनुदानित आणि विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत एक झाली होती. यामुळे लोकांना अनुदान मिळत नव्हते. ➡️या महिन्याच्या दरामध्ये मोठा बदल होत असल्याने या वेळी घरगुती गॅसवरील अनुदान नक्कीच तुमच्या खात्यात येईल. मागील अनुदानामध्ये कपातिचे कारण - ➡️गेल्या एका वर्षात एलपीजी सिलेंडरवरील अनुदानात सातत्याने कपात केल्यामुळे या काळात अनुदानित सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाले असूनअनुदान खाली शून्यावर आले आहे. ➡️गेल्या वर्षी जुलैमध्ये राजधानी दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची बाजारभाव म्हणजे अनुदान नसलेल्या सिलिंडरची किंमत ६३७ रुपये होती, जी आता खाली ५९४ रुपयांवर करण्यात आली आहे. संदर्भ -कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
65
1
इतर लेख