राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!
हवामान अपडेटलोकमत न्युज१८
राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!
➡️ मागच्या आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलं असून अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. ➡️ आज पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याची सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. ➡️ तर उद्या (16 जून) रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उद्या मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
88
23
इतर लेख