AgroStar
मान्सून ची तारीख पून्हा लांबणीवर... मेघराजा रूसलाय...!
हवामान अपडेटAgrostar
मान्सून ची तारीख पून्हा लांबणीवर... मेघराजा रूसलाय...!
🌧️हवामान विभागाने यंदा वेळे आधी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज दिला होता.देशभरातील शेतकरी आणि सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत. 🌧️त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. वेळे आधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मेघराजा तू रुसला काय? आता अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 🌧️दरम्यान, काही दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. त्यानंतर आता तो गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे. 🌧️आता राज्यात मान्सून 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. मान्सूनच्या या लंपडावामुळे शेतकरयांची मात्र चिंता वाढली आहे. 🌧️कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. अधून मधून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतो. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 🌧️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
235
24
इतर लेख