AgroStar
उन्हाळी भुईमूग पिकातील वाळवी नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी भुईमूग पिकातील वाळवी नियंत्रण!
"पांढरट तपकिरी, थोडी पारदर्शक मुंगी सारखी वाळवी आपल्या चांगल्याच परिचयातील आहे. या वाळवी किडीची मादी मातीत खूप खोलवर राहते. मातीमध्ये खोलवर राहून भुईमूग पिकाचे नुकसान करून जमिनीतील कार्बनी पदार्थ खातात. तसेच भुईमुगाच्या खोड, मुळ्या, तसेच कोवळ्या शेंगा दाणे फस्त करते. अशा ठिकाणी बुरशीची लागण होते ज्यामुळे अफ्लाटोक्झीन (कडवट दाणे) तयार होतात. या किडीचा प्रादुर्भाव वालुकामय, चिकणमाती किंवा हलकी जमिनीत दिसून येतो. नियंत्रणासाठी - ➡️ पिकातील दोन सिंचना दरम्यान निश्चित कालावधी ठेवावा. ➡️ शेतात न कुजलेला किंवा अर्धवट कुजलेला काडी कचरा ठेवू नये. गोळा करून शेत स्वच्छ ठेवावे. ➡️ थायमेथोक्झाम ७५% घटक असणारे 'शटर' हे कीटकनाशक @४०-५० ग्रॅम प्रति एकर २०० ते ४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी, ठिबक किंवा जमिनीद्वारे द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
25
8
इतर लेख