ब्राझील भारताकडून करणार ‘हे’ धान्य आयात
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
ब्राझील भारताकडून करणार ‘हे’ धान्य आयात
ब्राझीलने भारताकडून गहू, बाजरी व ज्वारी हे धान्य आयात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही देशाच्या कृषी मंत्रीच्या बैठकीनंतर ही अधिकृत माहिती दिली आहे.
कृषीमंत्रीच्या या माहितीनुसार कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ब्राझीलच्या कृषी, पशुपालन व खाद्य पुरवठा मंत्री क्रिस्टीन कोरिया डा कोस्टा डायससोबत बैठकीत वेगवेगळ्या द्विपक्षीय व्यवसायाच्या संधी आणि अन्य मुद्दयांवर चर्चा केली. दोन्ही मंत्र्यानी सांगितले की, कृषी भारत आणि ब्राझीलजवळ प्राथमिकता असलेले क्षेत्र आहे आणि त्यांनी कृषी संबंधित क्षेत्रात सहयोग वाढण्याचा संकल्प व्यक्त केला. डायस म्हणाले की. दोन्ही देशांमध्ये एकसमान आव्हान आहे. मोठया प्रमाणात लोकसंख्या कृषी क्षेत्राशी जोडलेली आहे. यामध्ये जास्तीत जास्त लहान व सीमांत शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे उत्पादन कमी असून ते बाजारापेठेपर्यंत पोहोचू शकत नाही. या दोन देशांमधील समस्या दूर केले, तर व्यापार आणि व्यावसायिक नाते मजबूत होऊ शकते. गहू, तांदूळ, बाजारी आणि ज्वारीसारखे असे काही उत्पादन आहेत. हे उत्पादन भारत ब्राझीलला निर्यात करेल. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, दोन्ही देश हे एकमेकांच्या गरजांची पूर्तता करू शकतात, त्यामुळे व्यापाराला प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. संदर्भ - आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, २४ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
63
0
इतर लेख