इफकोच्या या सेंद्रिय खतापासून होईल शेतकऱ्यांना फायदा!
कृषी वार्ताकृषि जागरण
इफकोच्या या सेंद्रिय खतापासून होईल शेतकऱ्यांना फायदा!
➡️शेतकरी शेतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करताना दिसतात. इफको या कंपनीने आजपर्यंत अनेक दर्जेदार रासायनिक खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केलेला आहे. अशातच शेतकऱ्यांच्या सेवार्थ इफकोनेसागरिका नावाचे सेंद्रिय खत तयार केले आहे. नेमके काय आहे सागरिका सेंद्रिय खत? ➡️इफकोने असे सेंद्रिय खत तयार केले आहे,यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादनआणि मातीचे गुणवत्ता दोन्ही वाढवता येतील व टिकवताहीयेतील. सागरिका सेंद्रिय खते समुद्री शैवाल पासून तयार केले जाते. म्हणून त्याला सागरिका असे नाव देण्यात आले आहे. अशा पद्धतीने करू शकता वापर ➡️२५० मिली द्रव्य सागरिका सेंद्रिय खत एक लिटर पाण्यात विरघळवून तुम्ही संपूर्ण एक एकर शेतात फवारणी करू शकतात.तसेच घन स्वरूपात असलेल्या सागरिका सेंद्रिय खताचा वापर तुम्ही एक एकर जमिनीसाठी आठ किलो पर्यंत घेऊन त्याचा वापर करू शकता. कंदवर्गीय भाजीपाला पिकासाठी उपयुक्त ➡️ शेतकऱ्यांनी जर सागरिका सेंद्रिय खताची फवारणी भाजीपाला वर्गीय पिकावर केली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. कांदा, बटाटा आणि लसूण सारख्या कंदवर्गीय भाज्यांसाठी या सेंद्रिय खताचा वापर करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहेत. सेंद्रिय खताची किंमत ➡️इफको या कंपनीने दोन वर्ष संशोधन करून सागरिका तयार केले आहे. यामध्ये विशेष असे की सागरिका आहे १०० टक्के सेंद्रिय खत आहे. कंपनीने सागरिका हे द्रव्य आणि घण अशा दोन्ही स्वरूपात मार्केटमध्ये आणले आहे. कंपनी नुसार एक लिटर द्रव्य बाटलीची किंमत पाचशे रुपये आहे आणि घन स्वरूपात दहा किलो सेंद्रिय खताची किंमत ४१५ रुपये आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-कृषि जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
68
16
इतर लेख