समाचारAgrostar
केंद्रीय बजेट 2023 - 24 मधील निर्णय!
👉🏻अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचा अर्थसंकल्प सादर केला .केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. 👉🏻सर्वप्रथम पाहूया 2023-24 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या आहेत. ◆कृषी कर्जाचे लक्ष्य 16.5 लाख कोटी रुपयांवरून 20 लाख कोटी रुपये करण्यात येईल. ◆ बागायती पिकांच्या उत्पादनासाठी 2,200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ◆ पुढील तीन वर्षांत 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाईल. ◆ सूक्ष्म खतावर भर दिला जाईल. ◆ डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ◆ 63000 कृषी सोसायट्या संगणकीकृत केल्या जातील. ◆ 'डिजिटल एक्सीलरेटर फंड' द्वारे कृषी स्टार्टअप्सचा प्रचार. ◆ श्री अन्न योजनेअंतर्गत भरड धान्य (बाजरी) ला प्रोत्साहन दिले जाईल. ◆ पशुसंवर्धन, मत्स्यपालन क्षेत्रात कर्ज देण्याचा वेग वाढवण्यात येईल. 👉🏻अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. -ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. -केवळ आर्थिक मदतच केली नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात आला आहे -यंदाच्या अर्थसंकल्पात 7 प्राधान्यक्रमे ठरवण्यात आले आहेत यामध्ये इन्फ्रा, ग्रीन ग्रोथ, फायनान्शियल सेक्टर, युथ पॉवर यांचा समावेश आहे. -अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. -तसेच भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. -निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अंत्योदय योजनेंतर्गत गोरगरिबांसाठी मोफत धान्य पुरवठ्यात एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. -जागतिक स्तरावर भरड धान्य वर्ष साजरा करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. - अॅग्रो स्टार्टअपसाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. तसेच येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. -गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड दिला जाईल. -50 नवी विमानतळ उभारन्याय येणार आहेत. -मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च करण्यात येईल. -44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच देण्यात येईल. 👉🏻संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3
इतर लेख