रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे मार्ग!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे मार्ग!
• खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असतानाच द्यावीत. • पेरणी करताना खते बियाण्यांखाली पेरून द्यावीत. • आवरणयुक्त खते/ ब्रिकेटस / सुपर ग्रॅन्यूलसचा वापर करावा. युरिया, निंबोळी पेंडसोबत १:५ प्रमाणात वापर करावा. • खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत. • सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा. • तृणधान्य पिकांसाठी खतांचा ४:२:२:१ (नत्र : स्फुरद : पालाश : गंधक) या प्रमाणात, तर कडधान्यांसाठी १:२:१:१ प्रमाणात खताचा वापर करावा. • सेंद्रिय खतांचा नियमित वापराने जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा. • मृदा सुरक्षेकरिता मृदा संधारण, सेंद्रिय शेती, एकात्मिक रासायनिक व सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य जोपासावे. ही काळाची गरज आहे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
181
27
इतर लेख