AgroStar
राज्याचा शेतमाल निर्यातीमधील टक्का वाढविण्याचा करणार प्रयत्न
कृषि वार्तापुढारी
राज्याचा शेतमाल निर्यातीमधील टक्का वाढविण्याचा करणार प्रयत्न
पुणे – केंद्रस्तरावरील शेतमाल निर्यातीमधील अडचणी सोडविण्यासाठी राज्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्याच्या कृषी निर्यात धोरणात सर्व शेतमाल निर्यात पिकांबाबत योग्य ते धोरण सर्व घटकांच्या अडचणी समजून तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पणन विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी दिली. त्याचबरोबर शेतमाल निर्यातीमधील राज्याचा टक्का वाढविण्यासाठी कृषी विभागाबरोबरच निर्यातदारांनी सांघिक प्रयत्न करण्याचे आदेश ही त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने कृषीमाल निर्यात धोरण जाहीर केल्यानंतर राज्याचे कृषी धोरण जाहीर केल्यानंतर राज्याचे कृषी धोरण तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तत्पुर्वी फळे, भाजीपाला, फुले व मसाले पिकांच्या निर्यातीबाबत असलेल्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याबाबत राज्य कृषी पणन मंडळाच्यावतीने नुकतीच एक बैठक झाली. संदर्भ – पुढारी, २५ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
3
0
इतर लेख