AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्टाची जबरदस्त योजना : १२४ महिन्यात दुप्पट करा आपला पैसा!
कृषी वार्तान्यूज18
पोस्टाची जबरदस्त योजना : १२४ महिन्यात दुप्पट करा आपला पैसा!
👉जर तुम्ही तुमचा पैसा दुप्पट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढे दिलेल्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. 👉या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला त्याचा पैसा सुरक्षित राहण्याचा आणि चांगला रिटर्न मिळण्याची गॅरंटी मिळते. पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. 👉पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूकीमुळे गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित असण्याबरोबरच चांगला रिटर्न होण्याची गॅरेंटी मिळते. 👉या योजनासाठीचा व्याजाचा दर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारकडून तिमाही आधारावर ठरवला जातो. 👉इंडिया पोस्टच्या वेबसाईट नुसार किसान विकास पत्र या योजनेत मॅच्युरिटी अवधी १२४ महिन्यांचा आहे. म्हणजेच या योजनेमध्ये ग्राहकांची गुंतवणूक १२४ महिने म्हणजे दहा वर्ष आणि चार महिने या कालावधीत दुप्पट होते. कोण 🤔गुंतवणूक करु शकते? किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे वय कमीत कमी आज १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. या योजनेत सिंगल अकाउंटच्या बरोबर जॉइंट अकाउंटची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ही योजना १८ पेक्षा कमी वय असलेल्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांची देखभाल त्यांचे पालक यांना करायचे असते. योजना हिन्दू अविभाजित परिवार किंवा एनआरआय यांना वगळता ट्रस्टसाठी लागू आहे. या योजनेमध्ये १ हजार रुपये, ५ हजार रुपये, १० हजार रुपये आणि ५० हजार रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत. त्यांना आपण खरेदी करू शकतो. या योजनेमध्ये असलेला व्याजदर या योजनेसाठी आर्थिक वर्ष २०२१ च्या दुसऱ्या तिमाही म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत व्याज दर ६.९ टक्के निश्चित केला गेला आहे. येथे तुमची गुंतवणूक १२४ महिन्यात दुप्पट होऊन जाते. जर आपण एका वेळेस एक लाख रुपये गुंतवणूक केले तर आपल्याला मॅच्युरिटीवर २ लाख रुपये मिळतात. १२४ महिन्यांचा कालावधी हा या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड आहे. ही योजना एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकते. तसेच ही योजना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित करता येते. या योजनेमध्ये नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकची आकारांमध्ये लागू करण्यात आले आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य या योजनेमध्ये गुंतवणूकीसाठी मर्यादा नसल्याकारणाने मनी लॉन्ड्रिंग सारख्या गोष्टीचा धोका असतो. त्यासाठी सरकार ने २०२४ मध्ये ५० हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्यांना पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. जर तुम्हाला १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला इन्कम प्रूफ सबमिट करावा लागतो. जसे की आयटीआर, सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंट इत्यादी. त्याशिवाय स्वतःच्या ओळख पत्रासाठी आधार कार्ड देणे अनिवार्य आहे. संदर्भ - न्यूज १८, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
0
इतर लेख