विजेच्या कडकडाटासह होणार मुसळधार पाऊस!
मान्सून समाचारडेलिहंट
विजेच्या कडकडाटासह होणार मुसळधार पाऊस!
अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र, समुद्रावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्याच्या हवामानात सतत बदल होत आहे. या बदलामुळे आता राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पुढील पाच दिवसात खबरदारीचे घेण्याचे आवाहन केले आहे. कारण या पाच दिवसात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने 13 जिल्हयांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर व नांदेड या 13 जिल्हयांना अलर्ट देण्यात आला आहे. परभणी व हिंगोली येथे तुरळक पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डेलिहंट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
88
9
इतर लेख