पशुपालनAgrostar
पशूंच्या आरोग्यासाठी करा लोहाचा वापर !
🐄जनावरांच्या आरोग्यात लोह फार महत्वाचे आहे. लोह रक्तातील साखरेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. लोह रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. लोह निरोगी त्वचा, केस आणि नखांसाठी महत्त्वाचे आहे. लोह हे रक्तनिर्मितीसाठी आवश्यक घटक आहे.
🐄लोहाच्या कमतरतेची लक्षणे :
१) रवंथ करणाऱ्या जनावरांच्यामध्ये अत्यंत थकवा दिसतो. अशक्तपणा येतो. त्वचा फिकट होते. छातीत दुखणे, जलद हृदयाचा ठोका होणे किंवा श्वास लागणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
२) पाय थंड होणे, जिभेची जळजळ किंवा वेदना होणे. नखे ठिसूळ होणे इत्यादी लक्षणे उद्भवतात.
३) वराह व त्यांच्या पिल्लांना पिगलेट ॲनिमिया आजार होतो.
🐄लोहाची कमतरता दूर करण्यासाठी उपचार :
१) जनावराला नियमित खाद्यातून लोह युक्त क्षार मिश्रणे द्या. मोठ्या जनावरांत ५० ते १०० ग्रॅम, तर लहान जनावरांत १५ ग्रॅम ते २० ग्रॅम हे प्रमाण ठेवा.
२) जनावराला पालेदार चार विशेषतः द्विदल चारा त्यांच्या वजनाप्रमाणे द्या.
3) आहारात लोह असलेले पदार्थ जास्त खायला द्या.
4) पशुआहारात जीवनसत्त्व 'क' असलेले अधिक अन्न पदार्थ समाविष्ट करा. कारण शरीरात लोह शोषण्यास मदत करते.
🐄संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.