AgroStar
भेसळयुक्त खतांची चिंता मिटणार ; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा!
कृषी वार्ताAgrostar
भेसळयुक्त खतांची चिंता मिटणार ; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा!
➡️सोलापूर जिल्ह्यात चक्क खतामद्धे मिठाची बेसळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सर्वच तालुका कृषी अधिकाऱ्यांची या विषयावर स्वतंत्रपणे बैठक घेऊन कृषी केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ➡️खतांचे नमुने, प्रयोगशाळेत चाचण्या तसेच किती नमुने घेतले, किती तपासणीला पाठवले, याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या ३० जुलैपर्यंत देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी दिले आहेत. नामवंत ब्रॅण्ड्च्या नावावर भेसळयुक्त खतांची विक्री करून शेतकऱ्यांना गंडवण्याचे काम सुरू आहे. ➡️त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी तातडीने गुणनियंत्रण अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी आणि पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यात सलग पाच दिवस (२५ ते २९ जुलैपर्यंत) कृषी केंद्रांची तपासणी करण्याची सूचना केली आहे. ➡️तसेच युद्धपातळीवर मोहीम म्हणून हा कार्यक्रम राबवावा, मुख्यतः विद्राव्य खतांचे (पाण्यात विरघळणारे) सर्व ग्रेडचे विविध कंपनीनिहाय खतांचे नमुने काढून तपासणी करावी, तसेच प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवा, असे आदेश दिले. ➡️शिवाय हे नमुने कशा पद्धतीने घ्यावेत, यासाठीही एका फॉर्मचा नमुना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यात संबंधित कृषी केंद्रांकडे ग्रेडनिहाय एकूण उपलब्ध साठा किती आहे, उत्पादन कुठून आयात केले, किती नमुने घेतले, त्याचा तपशील नोंदवण्यास सांगितले आहे. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
4
इतर लेख