पंतप्रधान मुद्रा योजना कोणासाठी?
योजना व अनुदानAgrostar
पंतप्रधान मुद्रा योजना कोणासाठी?
➡️छोटे व्यावसायिक, विक्रेते, कृषी क्षेत्रामध्ये सेवा पुरवठादार यांच्या नव्या व्यवसाय उभारणीसाठी पंतप्रधान मुद्रा योजना उपयोगी ठरते.या योजनेचा उद्देश पुरेसे भांडवल उपलब्ध नसलेल्या व्यक्तींना त्यांचा उद्योग, व्यवसायाच्या उभारणीसाठी किंवा विकासासाठी कर्जपुरवठा करणे हा आहे. ➡️पंतप्रधान मुद्रा योजना कोणासाठी :- ग्रामीण व शहरी छोटे व्यावसायिक, प्रोप्रायटर किंवा भागीदारी किंवा उत्पादक फर्म, लहान दुकानदार, भाजी विक्रेते, ट्रकचालक, खाद्य पदार्थ सेवा देणारे, विविध वस्तूंची दुरुस्ती करणारे, यंत्रचालक, लघू उद्योग, बलुतेदार, अन्न व खाद्यपदार्थ बनविणारे कृषिपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधमाशीपालन, कुक्कुटपालन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, ॲग्रो क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर, अन्न व कृषी प्रक्रिया, वितरक, किरकोळ व्यापारी, वाहतूकचालक, विविध कंपन्यांना छोट्या मोठ्या सेवा पुरवणारे अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांना त्यांच्या नवीन व्यवसाय उभारणीसाठी किंवा चालू असलेल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी कर्जपुरवठा केला जातो. ➡️कशा प्रकारे व किती कर्ज मिळू शकते : मुदत कर्ज किंवा खेळते भांडवल कमाल रु. १० लाख. ➡️कर्जाचे तीन प्रकार : शिशू : रु. ५०,००० पर्यंत किशोर : रु. ५०,००० पेक्षा जास्त व रु. ५ लाख पर्यंत तरुण : रु. ५ लाखांपेक्षा जास्त व रु. १० लाखांपर्यंत. ➡️कर्जदाराची स्वत:ची रक्कम किंवा भांडवल : शिशू : काही नाही किशोर : १५%, तरुण : १५% ➡️परतफेड कालावधी : अल्प मुदतीसाठी : कमाल ३६ महिने. मुदतीचे कर्ज : कमाल ८४ महिने. तारण : कर्जातून निर्माण झालेले घटक बँकेकडे तारण राहतात. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही अतिरिक्त तारण लागत नाही. व्याज दर :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया / बँक यांच्या नियमानुसार. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
49
9
इतर लेख