वेलवर्गीय पिकातील फळमाशी नियंत्रण!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकातील फळमाशी नियंत्रण!
काकडी, कारली, दोडका अश्या अनेक वेलवर्गीय पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. फळमाशीने फळांना डंक केल्यामुळे पुढे फळांची वाढ होत नाही यामुळे अपरिपक्व फळांची गळ होते किंवा फळ वाकडे होऊन ते फळ खाण्यायोग्य रहात नाही. यावर उपायोजना म्हणून पिक फुलोरा अवस्थेत असतानाच कामगंध सापळे एकरी ५ ते ७ लावावे. तसेच खराब झालेली फळे आढळून आल्यास काढून नष्ट करावी. तसेच फळातील कीड नियंत्रणासाठी पिकात क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन ५० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
68
20
इतर लेख