पशुपालनAgrostar
पूर्णाथडी' म्हशीला राष्ट्रीय मान्यता!
🐄दूध उत्पादनासाठी म्हैस फार महत्त्वपूर्ण असते . भारतामध्ये अनेक महत्त्वपूर्ण म्हैस प्रजाती आहेत. त्यापैकी महत्त्वाची प्रजात म्हणजे पश्चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हैस. या म्हशीला नुकत्याच भारतीय कृषी संशोधन केंद्र अंतर्गत राष्ट्रीय पशु आनुवंशिकी संसाधन ब्युरो,कर्नाल यांच्या वतीने नुकत्याच भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली व त्यामध्ये या म्हशीला राष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे.
👉पूर्णाथडी म्हैस पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळते व फिकट राखाडी असते.
👉हि म्हैस महाराष्ट्रातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदी काठच्या भागांमध्ये आढळते.
👉या म्हशीला स्थानिक पातळीवर विविध नावे असून त्यामध्ये गावळी,भुरी तसेच राखी या नावानेदेखील ओळखले जाते.
👉ही आकाराने लहान तसेच पूर्णाथडी म्हशीच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते तसेच प्रजनन क्षमता देखील उत्तम असून पालणाचा खर्च कमी लागतो.
👉तसेच या म्हशीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उष्ण हवामानात देखील ती चांगल्या प्रकारे तग धरते.
👉जर या म्हशीच्या दूध देण्याच्या प्रमाणाचा विचार केला तर दिवसा साधारणतः चार ते पाच लिटर दूध देते.
👉म्हैस सरासरी 250 दिवस दूध देते व एक हजार किलोग्राम पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे.
🐄संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.