कृषि वार्ताAgrostar
काढणीनंतर पावसामुळे पीक खराब झालंय?
➡️ गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे.पावसामुळे देशातील अनेक भागात काढणीसाठी ठेवलेल्या पिकांवर संकट आले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे याची भरपाई केली जाऊ शकते.
➡️पीएम पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विमा उतरवलेल्या पिकाची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला द्यावी लागते. शेतकरी टोल फ्री क्रमांकावर नुकसानीची माहिती देऊ शकतात.
➡️राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून शेतातील विविध पिकांची आपल्या ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत होती.परंतु आता खरीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी नोंदणी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
➡️ई-पीक पाहणी नोंद करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करून अँप डाउनलोड करा :https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
➡️संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा