AgroStar
बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण असे  करा तयार !
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण असे करा तयार !
➡️पिकांवर पडणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक प्रभावी बुरशीनाशक आहे. १८८२ मध्ये प्राध्यापक मिलारर्डेट यांनी बोर्डो मिश्रणाचा शोध लावला. ➡️बोर्डो मिश्रणातील घटक- 👉यासाठी निळे स्फटीकमय मोरचूद, कळीचा चुना आणि पाणी हे प्रमुख तीन घटक वापरले जातात. एक टक्का तीव्रतेचे शंभर लिटर द्रावण तयार करायचे असल्यास, एक किलो मोरचूद आणि एक किलो कळीचा चुना लागेल 👉यासाठी एक किलो मोरचूद रात्रभर ५० लिटर पाण्यामध्ये भिजत घालावा. प्लॉस्टिकच्या दुसऱ्या ड्रममध्ये ५० लिटर पाण्यात एक किलो चुना भिजत ठेवावा. हे दोन्ही द्रावण काठीने हलवून घ्यावे. मोरचूद आणि चुन्याचे द्रावण तिसऱ्या १०० लिटर ड्रममध्ये समप्रमाणात ओतत राहावेत. मिश्रण ओतताना ते काठीने ढवळत राहावे. या तयार झालेल्या मिश्रणाला बोर्डो मिश्रण असे म्हणतात. ➡️बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी – - वापरलेला कळीचा चुना हा खडक विरहीत असावा. - बोर्डो मिश्रण हे प्लॉस्टिक ड्रम किंवा प्लॉस्टिक बादलीमध्ये तयार करावे. - मिसळताना दोन्ही द्रावण थंड राहतील याची काळजी घ्यावी. - तयार केलेले बोर्डो मिश्रण जास्त काळ ठेऊ नये. ठेवायचे असल्यास कळीचा चुना आणि मोरचूदचे द्रावण मिक्स करू नये. - बोर्डो मिश्रणाची फवारणी करण्यासाठी ते फवारणी यंत्रामध्ये भरताना गळून मगच भरावे. ➡️ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
3
इतर लेख