वेलवर्गीय पिकांमध्ये मांडव/ताटी करण्याचे फायदे!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकांमध्ये मांडव/ताटी करण्याचे फायदे!
दोडका, कारले, काकडी, दुधी भोपळा यांसारख्या वेलवर्गीय पिकांना जोमदार वाढ व गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी मांडव किंवा ताटी तयार करून आधार देण्याची आवश्यकता असते. यामुळे पीक २ पाने अवस्थेत (वाढीची अवस्था) असताना मांडव/ ताटी तयार करावी. असे केल्याने वेलींची वाढ चांगली होते. फळांना माती लागत नाही. फळे निरोगी आणि लांबट होतात. दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने आंतरमशागत करणे सुलभ होते. ताटी अथवा मंडप पद्धतीमुळे भरपूर सूर्यप्रकाश खेळता राहतो, त्यामुळे फळांची प्रत सुधारते. वेलीवर कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी करणे सुलभ होते. फळांची तोडणी करणे अतिशय सोईस्कर होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
69
10
इतर लेख