AgroStar
रब्बीमधील पेरण्यांसाठी बियाण्यांचा मुबलक पुरवठा
कृषि वार्तापुढारी
रब्बीमधील पेरण्यांसाठी बियाण्यांचा मुबलक पुरवठा
पुणे – राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाने लावलेल्या चांगल्या हजेरीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होणार आहे. कृषी विभागाने रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्याचे नियोजन केलेले असून, त्याचा फायदा पेरणीखालील सरासरी क्षेत्रावरील पेरण्यांना होण्याची अपेक्षा आहे. ज्वारीबरोबरच हरभरा पिकाखालील क्षेत्रात भरीव वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागातून वर्तविण्यात आला.
राज्यात रब्बी हंगामाचे एकूण क्षेत्र ५४ लाख ४० हजार हेक्टर इतके आहे. त्यांची पीकनिहाय स्थिती पाहता रब्बी ज्वारी २१ लाख, गहू ९ लाख, मका ३ लाख, हरभरा २० लाख व करडई पिकाखाली १ लाख २५ हजार हेक्टर व तेलबियांचा समावेश आहे. बियाणेबदलाच्या दरानुसार प्रत्यक्षात एकूण बियाणांची गरज ८ लाख ५७ हजार ५७५ क्विंटल इतकी आहे. तर कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार ८ लाख ६७ हजार ९३१ क्विंटलइतक्या बियाणांची उपलब्धता करण्यात आलेली आहे. जी गरजेपेक्षा सुमारे १० हजार ३५६ क्विंटलने अधिक आहे. संदर्भ – पुढारी, १७ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
18
0
इतर लेख