AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदयाच्या किंमतीत होणार घट
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कांदयाच्या किंमतीत होणार घट
महाराष्ट्र आणि गुजरातमधून कांदयाचे उत्पादन वाढत असल्याने, कांदयाच्या किंमतीमध्ये घट होऊन प्रति किलो १५ ते ४० रू. झाला आहे. मात्र देशातील काही भागांमध्ये सध्या प्रति किलो ७०-९० रुपये कांदा आहे. चालू महिन्याच्या अखरेपर्यंत कांदयाची आवक वाढण्याची शक्यता असल्याने, कांदयाच्या किंमतीत प्रति किलो १० ते १५ रू. घट होण्याचा अंदाज आहे. ऑनियन मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि गुजरातमधून उशिरा पीक हंगामास सुरूवात झाल्याने, कांदयाची आवक वाढली व किंमतीमध्ये घट झाली.
माहिती ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की, सरकारने आतापर्यंत १८ हजार टन कांदयाची आयात केली आहे. मात्र आतापर्यंत दोन हजार टन कांदयाची विक्री झाली आहे. शासन ग्राहकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी आता २२ रू. प्रति किलोने कांदा विक्री करत आहे. _x000D_ संदर्भ - आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, १४ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
84
0