AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे!
आरोग्य सल्लासकाळ
आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे!
आंब्याचे शरीराला अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मात्र, याच आंब्यांच्या पानांचे देखील आरोग्यादायी फायदे असल्याचे तुम्हाला माहितीये का? मग चला तर आज आंब्यांचे पानांचे फायद्यांविषयी जाणून घेऊया... • आंब्यांच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचण्यापासून वाचवते. तसेच केस गळती देखील थांबते. • आंबांच्या कोवळ्या पानांमध्ये एंथोसायनिडिन टैनिट असते. त्यामुळे मधुमेहाची लागण होताच त्यावर या पानांमुळे उपचार करू शकतो. या पानांना वाळवून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर त्याचे सेवन करा. • पोटासंबंधी कुठल्याही समस्या असतील तर या पानांमुळे दूर होतात. काही पाने गरम पाण्यामध्ये घाला. त्यानंतर डब्बा बंद करून रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून सेवन करा. • उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर आंब्यांचा पानांचा काढा करून प्यावा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच तणावातून मुक्त होण्यास देखील लाभदायक ठरते. • श्वसनासंबंधी सर्व आजारांवर आंब्याची पाने गुणकारी असतात. पानांचा काढा करून मधासोबत सेवन केल्यास खोकलाही दूर होतो. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- सकाळ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
8