शेतकऱ्यांनो - मूग, उडीद दर तेजीत!
समाचारअ‍ॅग्रोवन
शेतकऱ्यांनो - मूग, उडीद दर तेजीत!
राज्यात पावसामुळे मुगाचे ४० टक्क्यांपर्यंत तर उडदाचे २५ टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. इतर राज्यांमध्ये देखील यंदा मूग, उडदाचे उत्पादन मर्यादित राहण्याची शक्यता असल्याने देशात मूग, उडदाचे बाजार पुढे तेजीत राहतील, अशी शक्यता वर्तविले जाते आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. परंतु वाढलेल्या पेऱ्याला मात्र मोठा तडाखा दिला आहे. मूग ६५ ते ७० दुवसांचे पीक असल्याने त्याचा काढणी हंगाम संपला आहे. मुगल शेंगामध्येच मोड तर काही भागात शेंगा फुटून दाण्यांचे नुकसान झाले आहे. ७५ ते ८० दिवसाचे पीक असलेल्या उडदाचा काढणी कालावधी पूर्ण झालेला नाही. मात्र, पावसामुळे उडदात शेंगा फुटीच्या समस्या असून गुणवत्ता घसरण्याचा अंदाज आहे. यामुळे काढणी करून वाळवलेला उडीद चांगले दर मिळण्यासाठी साठवून ठेवण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. तसेच "राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र हि मूग उत्पादक राज्ये आहेत. यंदा बहुतेक ठिकाणी कमी मूग आहे. तसेच उडदाचे उत्पादन देखील अपेक्षित होणार नाही. त्यामुळे बाजारात माल कमी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. परिणामी यंदा दिवाळीनंतर दर वाढू शकतात." असा अंदाज शास्त्रज्ञांना वाटतो.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
26
10
इतर लेख