AgroStar
अ‍ॅग्रोस्टार टॉप बुलेटिन!
कृषी वार्ताTV9 Marathi
अ‍ॅग्रोस्टार टॉप बुलेटिन!
शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर! गेल्या 10 दिवसांपासून तुरीचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. तुरीला सरासरी 5400 ते 5600 चा दर मिळत आहे. शिवाय साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आता खरेदीसाठी मोकळीकता मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात तुरीचे दर हे स्थिर राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! सरकारने इथेनॉलच्या किमती वाढवल्या! बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होण्यासाठी इथेनॉलच्या किमती ८० पैशांपासून ते २.५५ रुपये प्रति लिटरने वाढवल्यात. त्यामुळे उसावर आधारित इथेनॉलची किंमत ६२.६५रुपयांवरून ६३.४५ रुपये प्रतिलिटर होणार आहे. इथेनॉलच्या नवीन किमती १ डिसेंबर २०२१ पासून लागू होतील, अस केंद्रीय मंत्री यांनी सांगितले. थंडी वाढताच लाळ्या-खुरकूताचा प्रादुर्भाव! लाळ्या-खुरकूत हा संसर्गजन्य रोग आहे. थंडीला सुरवात झाली की या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय आजही शेतकरी पशूधनाची योग्य काळजी घेत नसल्याने हा आजार वाढत आहे. आतापर्यंत लसीकरण, पशु संवर्धन विभागाकडून राबण्यात आलेल्या उपाययोजना हे सर्व ठिक होते पण आता हा आजार शेतामधील गोठ्यातील जनावरांपर्यंत पोहचलेला आहे लाळ्या-खुरकूत हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे गोठ्यातील एकाही जनावराला त्याची लागण झाली तर धोका हा सर्वानाच असतो. याची लागण झाल्यावर पायाच्या दोन्ही नख्यांच्या मध्यभागी जखम होते. त्यामुळे जनावरे ही लंगडत चालतात.त्यामुळे असाह्य वेदनांपासून बचाव होण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
0
इतर लेख