सणासुदीच्या काळात तेल होणार स्वस्त; सरकारने घेतला मोठा निर्णय!
समाचारन्यूज १८लोकमत
सणासुदीच्या काळात तेल होणार स्वस्त; सरकारने घेतला मोठा निर्णय!
सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील सीमाशुल्क कमी केलं आहे. पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या शुल्कातील कपात गुरुवारपासून लागू करण्यात अली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिफायन्ड आरबीडी पाममेल, सोयाबीन आणि सूर्यफुलावरील शुल्क १७.५ टक्के करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त केंद्राने क्रूड पाम ऑइल वरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर २० टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर आणला आहे आणि कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल २० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (एसईए) च्या मते, प्रभावी शुल्क ८.२५ टक्के आणि कच्च्या सोयाबीन तेलावर ५.५ टक्के आणि सूर्यफूल तेलावरही आयात शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर कमी करण्यात येणार आहे. या कपातीमुळे, आरबीडी पामोलिन, रिफायन्ड सोयाबीन तेल आणि रिफायन्ड सूर्यफूल तेल यावर प्रभावी शुल्क १४ ऑक्टोबरपासून १९.२५ टक्के झालेत , अशी माहिती देण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, मोहरीचे तेल वगळता खाद्यतेलांच्या किरकोळ किमती ३.२६ टक्क्यांवरून ८.५८ टक्क्यांवर आल्या आहेत. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक यांनी सांगितले की, देशांतर्गत बाजारात किरकोळ किंमती वाढल्याने आणि सणासुदीच्या काळात सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. सरकारने मार्च २०२२ पर्यंत पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या कच्च्या वाणांवरी कृषी उपकर कमी केलाय. यामुळे सणासुदीच्या काळात तेलांचे दर कमी व्हावेत यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
37
5
इतर लेख