AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे कवच मिळणार!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
शेतमजुरांना अपघात विम्याचे दोन लाखांचे कवच मिळणार!
➡️देशातील असंघटित कामगार व शेतमजुरांना ई-श्रमपत्र मिळवून देणारी योजना शेतीत कोणत्याही प्रकारची मजुरी करणाऱ्यांना देखील लागू आहे. त्यामुळे नोंदणीकृत मजुरांना दोन लाखांपर्यंत अपघाती विम्याचे कवच मिळणार.अशी माहिती सूत्रांनी दिली. ➡️देशात ३८ कोटी असंघटित कामगार व मजूर आहेत. त्यांची माहिती संकलित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ई-श्रम’ नावाचे एक संकेतस्थळ (पोर्टल) सुरू केले आहे. तेथे मोफत नोंदणी करता येते. आतापर्यंत या संकेतस्थळावर देशभरातील आठ कोटींहून अधिक असंघटित कामगार, मजुरांनी नोंदणी केली आहे. ➡️नोंदणीची सुविधा ऑनलाइन व मोफत आहे. त्यामुळे गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर जाऊन शेतमजुरांनी नोंदणी करून घ्यावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या मजुरांना मार्गदर्शन व मदत करावी. ➡️नोंदणीकृत मजुराला कोणत्याही अपघातामुळे छोट्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास त्याला एक लाखाची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. अपंगत्व कायमस्वरूपी असल्यास किंवा मृत्यू झाल्यास मदतीची रक्कम दोन लाखांपर्यंत असू शकते. संकेतस्थळावर नोंदणी करताना हाताशी आधार क्रमांक, आधार संलग्न मोबाइल क्रमांक, बॅंक खात्याचा तपशील ठेवावा लागतो. तसेच मजुराचे वय १६ ते ५९ वर्षे या दरम्यान हवे आहे. कोण ठरू शकतात लाभार्थी ➡️शेती व शेतीसंलग्न क्षेत्रातील मजूर, रोजगार हमी योजनेवरील मजूर, बांधकाम क्षेत्र, मासेमारी, रोजंदारी करणारे मजूर, फलाटावर काम करणारे मजूर, फेरीवाले, घरगुती काम करणारे. कुठे करावी लागते नोंदणी ः https://register.eshram.gov.in या संकेतस्थळावर अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
38
9