राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे ४ दिवस धोक्याचे!
हवामान अपडेटमहाराष्ट्र टाइम्स
राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे ४ दिवस धोक्याचे!
देशात हलक्या थंडीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी थंडीबरोबरच धुके पडू लागले आहे. पण दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पावसाचे प्रमाण शक्यता हवामान विभागाने (IMD) दिली आहे. महाराष्ट्रातही पावसाची शक्यता यासोबतच ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- महाराष्ट्र टाइम्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
81
5
इतर लेख