भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक उत्पादन शक्य!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक उत्पादन शक्य!
शेतकरी बंधूंनो, वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे वाढवण्याच्या पद्धतीला ३ जी कटींग किंवा ३ जी शेंडा खुडणी पद्धत म्हणतात. या आधुनिक पद्धतीमुळे वेलवर्गीय व अन्य काही भाजीपाला पिकांचे अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे.याद्वारे वेलवर्गीय व अन्य काही भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढवणे शक्य आहे. थ्रीजी कटिंग केल्यामुळे नर व मादी फुलांचे प्रमाण समान होते किंवा मादी फुलांचे प्रमाण वाढते. वेलवर्गीय भाजीपाला पिके उदा. दुधी भोपळा, दोडका, काकडी, डांगर, कोहळा या सोबतच टोमॅटो, भेंडी, वांगी आणि मिरची इ. पिकांमध्ये ३ जी कटिंग पद्धत उपयुक्त ठरत आहे. • पद्धत : सर्वप्रथम पीक लागवड केल्यानंतर त्या पिकाची उंची तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यावी. सुरुवातीच्या पाच ते सात पानांपर्यंत कोणतीही उपशाखा त्या झाडावर येऊ देऊ नये. • उपशाखा आल्यास त्या ताबडतोब कापून किंवा खुडून टाकाव्यात. या आलेल्या उपशाखांवर नर फुलांचे प्रमाण अधिक असते. पाच ते सात पानानंतर येणाऱ्या उपशाखा खुडू नयेत. त्या नैसर्गिकरित्या वाढू द्याव्यात. झाड किंवा वेली पाच ते सात फूट उंचीच्या झाल्यावर त्याच्या मुख्य शाखेचा शेंडा खुडावा. त्यामुळे त्याची सरळ वाढ थांबून त्यावर उपशाखा येण्यास सुरुवात होते. • आलेल्या उपशाखांवर १२ ते १५ पाने झाली की त्यांचा पुन्हा शेंडा खुडावा. त्यावर पुन्हा उपशाखा येतील. या आलेल्या उपशाखांची पुन्हा वाढ करून घ्यावी. या पद्धतीने मुख्य शाखा म्हणजे पहिली पिढी, • या क्रमाने रोपांची किंवा वेलींची वाढ करून घ्यावी. आलेल्या तिसऱ्या पिढीच्या शाखांची वाढ चांगल्या रीतीने होऊ द्यावी. त्यावर मादी फुलांची उत्पत्ती होते. त्यामुळे फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होते. घ्यावयाची काळजी : • थ्रीजी कटिंग करताना प्रत्येक १० ते १५ झाड किंवा वेलीनंतर थ्रीजी कटिंग न करता एक झाड किंवा वेल नैसर्गिकरित्या वाढू द्यावी. त्यामुळे त्यावर अधिक नर फुले येतील. • ही फुले परागीभवनासाठी उपयुक्त ठरतील. या वेलींवर अधिक फळधारणा होत असल्याने अन्नद्रव्याचे व पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. • सामान्य पिकाच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे पिकासाठी लागणरी अन्नद्रव्यांचे प्रमाणही जास्त असते. मुख्य शाखावर दोन किंवा तीन उपशाखा वाढवून त्यावर १२ ते १५ पाने येऊ द्यावीत. त्यानंतर या उपशाखांचा शेंडा खुडून त्यावर परत दोन ते तीन शाखा वाढवाव्यात. रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक योग्य नियोजन करावे. फायदे - वेलींवर मादी फुलांचे प्रमाण वाढल्याने अधिक फळधारणा होते. • थ्रीजी कटिंग केल्यामुळे प्रती झाड किंवा कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन मिळते. एकरी उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा वाढतो
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
93
49
इतर लेख