AgroStar
शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात सुलभ पीककर्ज अभियान
कृषि वार्तापुढारी
शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात सुलभ पीककर्ज अभियान
पुणे – राज्यात रब्बी हंगामात सुलभ पीककर्ज अभियान राबविण्याबाबतच्या सुचना राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी परिपत्रकीय सुचना जारी केल्या आहेत. सर्व विभागांना बरोबर घेऊन डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत राज्यातील सर्व जिल्हयांत रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी पीक कर्जपुरवठा करण्याकरिता अभियान राबविण्यात येणार आहे. अभियान राबविण्यामध्ये महसूल विभाग, संबंधित गावातील विकास सहकारी, संस्थांचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे निरीक्षक दर्जाचे अधिकारी तसेच विविध व्यापारी बॅंकांच्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अभियानामध्ये चावडी, गावस्तरावर कर्जमेळावे आयोजित कऱण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापकावर सयुक्तपणे देण्यात आलेली आहे. तीन ते चार गावांसाठी मिळून एक या पध्दतीने मेळावे घेताना ठिकाण निवडण्याची जबाबदारी तालुका, उप व सहाय्यक निबंधकांवर देण्यात आलेली आहे. या मेळाव्यास संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील, जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी उपस्थित राहणे शक्य होईल. संदर्भ – पुढारी, २० डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
30
0
इतर लेख