AgroStar
मधुमक्षिकापालनात घेण्याची काळजी
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मधुमक्षिकापालनात घेण्याची काळजी
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि इतर काही राज्यातील शेतकरी शेतीबरोबरच मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय करत आहेत. मधमाशांच्या विविध जातींपैकी, भारतीय आणि इटालियन मधमाशा पाळणे सोयीचे आहे. भारतीय मधमाशांचे व्यावसायिक पालन करून, एका खोक्यातून वर्षाला 15 ते 30 किग्रॅ मध गोळा करता येतो. इटालियन मधमाशा भारतीय मधमाशांच्या तुलनेत आकाराने मोठ्या आणि स्वभावाने मवाळ असतात. इटालियन मधमाशांचे व्यावसायिक पालन करून, एका खोक्यातून वर्षाला सरासरी 30 किग्रॅ आणि जास्तीत जास्त 70 किग्रॅ मध मिळतो. बहुतेक वेळा, व्यावसायिक मधुमक्षिकापालनासाठी इटालियन मधमाशा वापरल्या जातात. मधुमक्षिकापालनामुळे मध मिळतोच तसेच त्यामुळे पिकातील परागीभवनाला सुद्धा मदत होते. परिणामी उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता सुद्धा सुधारते. पर्यायी उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी हा व्यवसाय अंगिकारू शकतात. मधुमक्षिकापालनात घेण्याची काळजी:  वर्षभर पराग आणि मध मिळण्यासाठी पिकांचे सतत नियोजन करा आणि अशा पिकांची सतत लागवड करा.  जेव्हा मधमाशा अशा पिकांना जास्त वेळा भेट देतात, तेव्हा त्या पिकांवर औषधे फवारणे टाळा.  मधमाशांसाठी चांगल्या दर्जाच्या लाकडापासून बनवलेली खोकी वापरा. वापरण्यापूर्वी खोके फॉर्मल्डीहाईडच्या द्रावणाने स्वच्छ करा. खोकी थंड, स्वच्छ लाकडी स्टँडवर मांडून ठेवा. पाण्याने भरलेले भांडे स्टँडखाली ठेवावे म्हणजे किडे आणि मुंग्या खोक्यांमध्ये शिरणार नाहीत. रोज सकाळी खोकी नीट स्वच्छ करा.  खोक्यांची जागा वारंवार बदलू नये. जर आवश्यकता असेल तर, फक्त रात्री जागा बदला.  जर काही खोक्यांमध्ये, मधमाशा मृत झालेल्या आढळल्या तर त्याचे कारण शोधावे आणि योग्य पावले उचला.  राणी मधमाशी खोक्याच्या खालच्या भागात राहते, त्यामुळे तिला वरच्या भागात जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी मध्ये एक जाळी बसवा.  खोक्यांच्या भोवती स्वच्छ पाण्याची व्यवस्था करा.  जेव्हा शेतात पुरेसे पीक उपलब्ध नसेल तेव्हा, मधमाशांसाठी खाद्य म्हणून साखरेचे पाणी ठेवा.  मधमाशांच्या घरांभोवती माशांचे थेट गार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी वाऱ्याला प्रतिबंध करणारी झाडे लावा.
 राणी मधमाशी कामकरी मधमाशांबरोबर जाऊ नये म्हणून तिचा एक पंख कापा.  मधमाशांच्या खोक्यावर थेट पाऊस पडणार नाही, अशी व्यवस्था करा.  जर हवा जास्त थंड असेल, तर रात्री खोक्यांवर पोते घाला आणि सकाळी पोते काढा.  उन्हाळ्यात, खोके झाडाखाली सावलीत ठेवा म्हणजे थेट उन्हापासून संरक्षण होईल. जर शक्य असेल तर, थंडपणा येण्यासाठी जमिनीला पाणी घाला.  आजारी मधमाशांचे खोके इतर खोक्यांपासून वेगळे ठेवा आणि आजार नियंत्रित करण्यासाठी योग्य पावले उचला.  कोळी त्यांचे आयुष्य मधमाशांवर बाह्य परजीवी म्हणून व्यतीत करतात. त्यामुळे, त्यांचे नियंत्रण करण्यासाठी, सल्फर पावडर फवारा.  मधमाशांचे मुंग्या, लाकूड कुरतडणाऱ्या मुंग्या, सरडे, पाली, इंडियन स्पॅरो हॉक, कोतवाल, काही गांधीलमाशा, स्फिंक्स पतंग, मेणकीडा इ. अनेक शत्रू आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचला.  मधमाशांमधील फाऊल ब्रीड, नोसेमा, सेप्टीसेमिया इ. सारखे आजार योग्य काळजी घेऊन आणि आवश्यक पावले उचलून रोखावेत. टीप: शुद्ध मधाचा घनीभवन होणे हा एक गुणधर्म आहे. जर तो गरम पाण्यात किंवा सूर्यप्रकाशात ठेवला तर तो पुन्हा मूळ रुपात येतो. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
61
2
इतर लेख