AgroStar
महाशिवरात्री:जाणून घ्या कोणता असेल शुभ मुहूर्त, कशी करणार पूजेची तयारी?
सण विशेषindia.com
महाशिवरात्री:जाणून घ्या कोणता असेल शुभ मुहूर्त, कशी करणार पूजेची तयारी?
➡️शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. शिवरात्री वर्षातून दोन वेळा येते. पहिली शिवरात्री फाल्गुन महिन्यात येते आणि दुसरी शिवरात्री श्रावण महिन्यात साजरी केली जाते. ➡️यंदा महाशिवरात्री १ मार्च २०२२ रोजी (मंगळवारी) साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की जे भक्त महाशिवरात्रीला भगवान शिव आणि पार्वतीची मनोभावे पूजा करतात तसेच विधीपूर्वक उपवास करतात त्यांच्या सर्व मनोकामना भगवान शिव आणि पार्वती पूर्ण करतात. या दिवशी महाशिवरात्री पूजा चारही प्रहरात केली जाते. ➡️येथे आपण जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि चारही प्रहरात केल्या जाणाऱ्या पूजेची वेळ काय आहे? महाशिवरात्री प्रारंभ तिथी – १ मार्च २०२२ रोजी पहाटे ३.१६ वाजता महाशिवरात्री समाप्ती तिथी – २ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता महाशिवरात्रीला चारही प्रहरात पूजा करण्याचा शुभ मुहूर्त ➡️रात्रीच्या पूजेचा वेळ – १ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.२२ वाजेपासून ते रात्री १२.३३ वाजेपर्यंत ➡️पहिला प्रहर – सायंकाळी ६.२१ वाजेपासून ते ९.२७ वाजेपर्यंत ➡️दुसरा प्रहर – रात्री ९.२७ वाजेपासून ते १२.३३ वाजेपर्यंत ➡️तिसरा प्रहर – रात्री १२.३३ वाजेपासून ते सकाळी ३.३९ वाजेपर्यंत ➡️चौथा प्रहर – २ मार्च २०२२ रोजी सकाळी ३.३९ वाजेपासून ते ६:४५ वाजेपर्यंत. या गोष्टींची घ्या काळजी 1)महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे. 2)त्यानंतर केसरच्या आठ वाट्या जल अर्पण करून रात्रभर दिवा लावावा. 3)यानंतर भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा. 4)भगवान शंकराला भांग, धतुरा, बेलपत्र, तुळस, जायफळ, कमळ गट्टे, पाच प्रकारची फळे, गोड सुपारी, उसाचा रस, फुले आणि काही धन अर्पण करावे. 5)यानंतर केशरची खीर बनवावी आणि ती भगवान शंकराला अर्पण करून लोकांमध्ये वाटावी. 6)वरील गोष्टी अर्पण करताना ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय असा जप करावा. संदर्भ:- India.com हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
8
इतर लेख