AgroStar
भुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
भुईमूग पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीस लष्करी अळी किंवा तंबाखू सुरवंट म्हणून ओळखले जाते. उबदार हवामान परिस्थितीत या अळीचा प्रादुर्भाव दीर्घ कालावधीसाठी राहतो. लहान अळी पानांमधील हरितद्रव्ये खातात तर मोठ्या अळ्या पानांच्या शिरा सोडून बाकी हिरवे पान खातात. त्यामुळे पाने पिवळी पडून गळून जातात. दिवसा वेळी अळी जमिनीमध्ये लपतात आणि रात्रीच्या वेळी पिकावर उपजीविका करतात. ते फुलांवर त्याचबरोबर माती वाढणार्या शेंगावर देखील आपली उपजीविका करतात. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पिकावरील अळींचा प्रादुर्भाव जास्त असतो. व्यवस्थापन: • प्रति एकरी ५ ते ७ फेरोमोन सापळे बसवावे. • अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच, निंबोळी बियांपासून बनविलेला अर्क (५%) @५०० मिली किंवा निमार्क @४० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • बव्हेरिया बॅसियाना हि बुरशीजन्य पावडर @४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंजिनिसिस हि जिवाणूजन्य पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • (पाने खाणाऱ्या अळीसाठी) न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस (NPV) @२५० एलई तर (हरभरा घाटे अळीसाठी) @४५० एलई प्रति हेक्टरी फवारणी करावी. • अळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास, मिथोमिल ५० डब्लूपी @१२.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • कीटकनाशकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी औषधाच्या द्रावणात गुळाचे द्रावण मिसळू शकता.
डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
261
2
इतर लेख