AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ह्यूमिकचे शेतीतील महत्व व त्याचे फायदे!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ह्यूमिकचे शेतीतील महत्व व त्याचे फायदे!
शेतकरी बंधूंनो, आपण पिकामध्ये पांढऱ्या मुळ्यांची व पिकाची जोमदार वाढीसाठी ह्यूमिक ऍसिडचा बेसडोस, ठिबकद्वारे किंवा पिकाच्या आवश्यकतेनुसार खतांमध्ये मिसळून देत असतो. तर या लेखामध्ये आपण ह्यूमिक चे गुणधर्म व फायदे जाणून घेणार आहोत. ह्युमिक ऍसिड चे गुणधर्म :- ह्युमिक ऍसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे. • ह्युमिक ऍसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायड्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते. • ह्युमिक ऍसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते. ह्युमिक ऍसिडचे फायदे : • ह्युमिक ऍसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते. • मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिर ठरते. • नत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते. • याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते. • ह्युमिक ऍसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते. • ह्युमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे. • जमिन हलकी होऊन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते. • याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कॅल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात. • बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते. • ह्युमिक ऍसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते. • सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते. • युरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
117
68
इतर लेख