AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘ह्या’ भागात हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार!
हवामान अपडेटkrushinama
‘ह्या’ भागात हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार!
➡️कोरोनाचे संकट डोक्यावरच असताना आता थंडीत पाऊस पडणार आहे त्यामुळे आजारांना पुन्हा आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही आठवड्यांपासून खूप थंडी वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरल्याने बऱ्याच भागात आपल्याला शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. ➡️राज्यात बऱ्याच जिल्ह्याचे तापमान १० अंशांच्या खाली गेलं होतं. पण आता एवढ्या थंडीत महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसरळणार आहे. ➡️फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ ते ४ फेब्रुवारी राज्यात पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात गारठा वाढल्याचे दृश्य आहे. ➡️धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड. ह्या जिल्ह्यात खूप थंडी जाणवत असून पुढील आठवड्यात थंडी ओसरणार आहे. तसेच हवामान विभागाने सांगितले आहे कि ‘फक्त थंडी कमी होणार नसून पावसाच्या सरी देखील कोसळतील. ➡️उत्तर-पश्चिम भारतात १ ते ५ फेब्रुवारी ताशी १०-२० कि.मी. वेगाने वारे वाहणार आहे.यामुळे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात. संदर्भ:-krushinama, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
81
12