AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हे बंध रेशमाचे! जाणून घ्या रक्षाबंधन चा इतिहास !
विशेष दिवस Agrostar
हे बंध रेशमाचे! जाणून घ्या रक्षाबंधन चा इतिहास !
➡️रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींचा खास सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हिंदू धर्मात वैदिक काळापासून प्रत्येक सणात भाद्राची विशेष काळजी घेतली जाते. यावेळी राखीमध्येही भाद्र कालावधी असणार आहे. ➡️रक्षाबंधनाची कथा : रक्षाबंधनाविषयी एक कथा आहे की, वैदिक काळात एकदा देव आणि असुर यांच्यात घनघोर युद्ध झाले. सलग 12 वर्षे देवांचा पराभव होत राहिला. हे पाहता देवमंत्री गुरु बृहस्पती यांच्याकडून युद्ध थांबवण्याची परवानगी घेऊन इंद्राणींनी देवराज इंद्राचे रक्षाबंधन केले. या प्रभावामुळे असुरांचा वध करण्यात इंद्राला यश आले. ➡️रक्षाबंधनाचे महत्व : रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा 1१ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक मानला जातो. हिंदू परंपरेनुसार, रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे सामाजिक बंध दृढ करतो. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे वचन घेतात, त्यानंतर बहीणही आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. ➡️रक्षा बंधनामागचे शास्त्र : राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र सांगण्यात आले आहे. आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात. सणवार साजरी करण्यामागे भावनांप्रमाणे शास्त्रेही असतात. त्यापैकीच हे एक शास्त्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण अधिक असते असे सांगण्यात येते. यमलहरी या पुरूषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतीमान होतात असा समज आहे. त्यामुळे या यमलहरी देहात चालू झाल्या की, सूर्यनाडी जागृत होऊन त्यांच्या जीवाला त्रास होतो. पण त्याचवेळी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते. त्यामुळे एका अर्थी बहिणी आपल्या भावाच्या जीवाचे रक्षण करते असे शास्त्र सांगते. राखीचे बंधन घालून या सूर्यनाडीला शांत करण्याचे काम बहिण करते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2