AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ही बँक शेतकऱ्यांना देतेय 50 लाखांपर्यंत गृहकर्ज!
योजना व अनुदानBy India.com
ही बँक शेतकऱ्यांना देतेय 50 लाखांपर्यंत गृहकर्ज!
➡️नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी ‘स्टार किसान घर योजना’ नावाची विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घरबांधणीपासून ते घर दुरुस्तीच्या कामापर्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ➡️बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. वास्तविक ही योजना बँक ऑफ इंडियाने फक्त आपल्या शेतकरी ग्राहकांसाठी सुरू केली आहे. बँक देते ५० लाखांपर्यंतचे गृहकर्ज ➡️या विशेष योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया जबरदस्त सुविधा देत आहे. परंतु या योजनेचा लाभ काहीच शेतकरीच घेऊ शकतात. ज्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊस बांधायचे आहे किंवा सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करायचे आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ➡️आता शेतकर्‍यांना त्यांच्या स्वप्नातील घर व गोडाऊन बांधणे खूप सोपे झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना १ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज ८.०५ टक्के व्याजदराने मिळणार आहे. त्याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ वर्षांचा कालावधी दिला जाईल. घर व गोडाऊन दुरुस्तीसाठी १० लाख रुपये! ➡️बँक ऑफ इंडियाच्या या योजनेचा लाभ फक्त KCC खाते असलेले शेतकरी घेऊ शकतात. या विशेष योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन फार्म हाऊस किंवा घर बांधण्यासाठी १ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाईल. याशिवाय सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. ➡️या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आयटी रिटर्न देण्याची गरज भासणार नाही. बँक ऑफ इंडियाच्या ‘स्टार किसान घर’ कर्ज योजनेशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या बँक ऑफ इंडिया शाखेला देखील भेट देऊ शकता किंवा बँकेच्या टोल फ्री क्रमांक १८०० १०३ १९०६ वर संपर्क साधू शकता. संदर्भ:- By India.com , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
275
48
इतर लेख