पशुपालनAgrostar
हिवाळ्यात कोंबड्याची अशी घ्या काळजी!
🐥थंडी चा काळ हा जनावरांसाठी अतीशय महत्वाचा आहे, त्यात कोंबड्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण त्यांच्या शरीराचे तापमान बाकीच्या जनावरांच्या तुलनेत थोडे जास्त असते त्यामुळे थंडी च्या काळात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात काळजी न घेतल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता,अंडी उबवणी क्षमता,अंडी उत्पादन,पाणी पिण्याची क्षमता अश्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कमी तापमानाच्या काळात त्यांच्या आहाराकडे आणि शेडमधील व्यवस्थापणाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
🐥आहार व्यवस्थापन :
१. कोंबड्यांना संतुलित आहार पुरवावे जेणेकरून त्यांची रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहील.
२. शेडमध्ये फीडर्स संख्या वाढवावी.दिवसभर त्यांना मुबलक खाद्य मिळेल याची नोंद घ्यावी.
३. खाद्य बनवताना ऊर्जा असणाऱ्या स्रोतांचा प्रामुख्याने स्निग्ध पदार्थांचा वापर करावा.
४.हिवाळ्यामध्ये कोंबड्या खुप कमी पाणी पितात.कोंबड्याना ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.
🐥कोंबडयांच्या शेडचे व्यवस्थापन:
१. व्यवस्थापन मध्ये अचानक कुठलंही बदल करू नये.
२. शेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शेडमध्ये येण्यास मदत होते.
३. हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस तापमान खुप कमी होते,त्यामुळे शेडच्या ज्या भागातून थंड हवा येते अश्या ठिकाणची पूर्ण जागा पडद्यानि बंद करून घ्यावेत आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उघडून घ्यावेत जेनेकरून सकाळी सुर्यप्रकशाची किरण शेडमध्ये येतील नि कोंबड्याना उब मिळेल.
४. शेडमधील हवा खेळती राहण्यासाठी भिंती कमी उंचीच्या व वर जाळी बसवलेली असावी.
५. प्रदूषित हवा बाहेर फेकण्यासाठी एक्झॅस्ट फॅनची व्यवस्था करावी.
६. शेडमधील हवा खेळती नसेल तर कोंबड्यांचा विष्टेतुन तयार होणाऱ्या अमोनिया वायूमुळे श्वसन विषयी समस्या तयार होतात.त्यामुळे कोंबड्याना ताप येणे,खोकलने,छातीत दुखणे,श्वसनास त्रास होणे,तोंड पसरून श्वास घेणे,भूक मंदावणे,घरघर असा आवाज येणे अश्या बऱ्याच समस्या उद्भवतात.
🐥संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.