हवामान अपडेटAgrostar
हिवाळ्यात कफ दूर करा या 5 देशी उपायांनी!
✅हिवाळ्यात सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि कफ जमा होण्याची समस्या सामान्य असते. सर्दी, फ्लू किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे गळा आणि छातीत कफ साचतो, ज्यामुळे श्वसनमार्ग अडथळित होतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. कफ दीर्घकाळ राहिल्यास इतर आजार उद्भवू शकतात. कफपासून मुक्त होण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतात.
1. हळदीचा वापर:
गरम पाण्यात कच्ची हळद टाकून गुळण्या करा. हळदीतील अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कफ कमी करण्यात मदत करतात.
2.मध आणि काळी मिरी:
एका चमचा मधात थोडी काळी मिरी पावडर टाकून सेवन करा. हे दिवसातून 3-4 वेळा केल्याने कफ कमी होतो.
3.वाफ घेणे:
पाण्यात कापूर किंवा निलगिरी तेल टाकून वाफ घ्या. यामुळे कफ मऊ होतो आणि सहज बाहेर पडतो.
4. मीठाच्या पाण्याने गुळण्या करा:
गरम पाण्यात मीठ टाकून दिवसातून 2-3 वेळा गुळण्या करा. यामुळे कफ लवकर कमी होतो आणि श्वसनमार्ग स्वच्छ होतो.
5. तुळस आणि आले:
तुळस आणि आलं यांचा उपयोग औषध म्हणून केला जातो. तुळशी-आल्याचा चहा दिवसातून 2-3 वेळा प्यायल्याने कफ आणि घशाच्या खवखवीत आराम मिळतो.
✅हे साधे उपाय कफाची समस्या कमी करण्यात आणि थंडीच्या हंगामात आरोग्य सुधारण्यात खूप फायदेशीर ठरतात.
✅संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.