AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हिरव्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारातील महत्त्व!
पशुपालनAgrostar
हिरव्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारातील महत्त्व!
🌱 हिरव्या चाऱ्यामध्ये वाळलेल्या चाऱ्याच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण अधिक असते. हिरवा चारा चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. त्यामुळे चारा वाया जात नाही. ✔️ जनावरांना सहज विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा होतो. त्यामुळे हा चारा पचनास सुलभ असतो. ✔️ द्विदलीय हिरव्या चाऱ्यातून खनिज व प्रथिनांचा पुरवठा होतो. ✔️ हिरवा चारा रुचकर, रसदार असल्यामुळे पौष्टिक असतो. त्याच्या सेवनामुळे जनावरांची भूक भागविण्यास मदत होते. ✔️ हिरवा चारा नेहमी दिल्यामुळे जनावरांचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते. ✔️ जनावरास ताजी पोषकद्रव्ये नैसर्गिक स्वरूपात मिळत असल्यामुळे चाऱ्यातील पोषक घटकांचा शरीराला चांगला फायदा होतो. ✔️ जनावरांच्या शरीरात जीवनसत्त्व अ (कॅरोटिन)चा पुरवठा होऊन रातांधळेपणा टाळण्यास मदत होते. त्वचाही उत्तम राहते. ✔️ हिरव्या चाऱ्यातील अधिकाधिक घटक विद्राव्य स्वरूपात असतात. त्यामुळे पचनाचा जनावरांच्या शरीरावर ताण पडत नाही. ✔️ आर्जीनीन, ग्लुटॅमिक आम्लासारख्या महत्त्वाच्या आम्लाचा शरीराला पुरवठा होतो. ✔️ गर्भावस्थेतील जनावरांच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, आंधळी अथवा अन्य शारीरिक अपंगत्व घेऊन जन्माला येतात. ✔️ जनावरांचे किमान ८ लिटर दूध केवळ संतुलित पौष्टिक हिरवा चारा देऊन टिकविता येऊ शकते. ✔️ अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक काळ उत्तमरीत्या टिकवून ठेवण्याकरिता हिरवा चारा दैनंदिन आहारात देणे गरजेचे आहे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख