AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हिरव्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारातील महत्त्व
पशुपालनअॅग्रोवन
हिरव्या चाऱ्याचे जनावरांच्या आहारातील महत्त्व
• हिरव्या चाऱ्यामध्ये वाळलेल्या चाऱ्याच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण अधिक असते. हा चारा चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात असल्यामुळे चारा वाया जात नाही. • जनावरांना सहज विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा होतो. त्यामुळे हा चारा पचनास सुलभ असतो. • द्विदलीय हिरव्या चाऱ्यातून खनिज व प्रथिनांचा पुरवठा होतो. • हिरवा चारा रुचकर, रसदार असल्यामुळे पौष्टिक असतो. या चाऱ्याच्या सेवनामुळे जनावरांची भूक भागविण्यास मदत होते. • हिरवा चारा नेहमी दिल्यामुळे जनावरांचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते. • जनावरास ताजी पोषकद्रव्ये नैसर्गिक स्वरूपात मिळत असल्यामुळे चाऱ्यातील पोषक घटकांचा शरीराला चांगला फायदा होतो. • जनावरांच्या शरीरात जीवनसत्त्व अ (कॅरोटिन)चा पुरवठा होऊन रातांधळेपणा टाळण्यास मदत होते. त्वचा ही उत्तम राहते.
• हिरव्या चाऱ्यातील अधिकाधिक घटक विद्राव्य स्वरूपात असल्यामुळे पचनाचा जनावरांच्या शरीरावर ताण पडत नाही. • आर्जीनीन, ग्लुटॅमिक आम्लासारख्या महत्त्वाच्या आम्लाचा शरीराला पुरवठा होतो. • गर्भावस्थेतील जनावरांच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, आंधळी अथवा अन्य शारीरिक अपंगत्व घेऊन जन्माला येतात. • जनावरांचे किमान ८ लिटर दूध केवळ संतुलित पौष्टिक हिरवा चारा देऊन टिकविता येऊ शकते. • अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक काळ उत्तमरीत्या टिकवून ठेवण्याकरिता हिरवा चारा दैनंदिन आहारात देणे गरजेचे आहे. संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
865
0
इतर लेख