AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे चारा निर्मिती
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे चारा निर्मिती
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा चाराटंचाई परिस्थितीत कमी खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे. मातीशिवाय फक्त पाण्याचा वापर करून ट्रेमध्ये धान्याची उगवणपासून तयार झालेल्या चाऱ्याला हायड्रोपोनिक्‍स चारा असे म्हणतात. हा चारा ७ ते ९ दिवसांत २० ते ३० सें.मी. उंचीचा तयार होतो. ह्या चाऱ्यामध्ये प्रथिने आणि पचनीय ऊर्जेचे प्रमाण जास्त असते.
1. हायड्रोपोनिक्‍स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, ५० टक्के क्षमतेचे शेडनेट,फॉगर सिस्टिम यांची गरज असते._x000D_ 2. या साधनसामग्रीचा वापर करून ७२ स्क्वेअर फूट जागेत बसेल असा २५ फूट x १० फूट x १० फूट आकाराचे शेड ची आवश्यकता असते _x000D_ ३. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बार्ली याचा वापर केला जातो._x000D_ ४. हे धान्य १०ते१२ तास भिजत ठेवून, २४ तास सावलीत गोणपाट ठेवावे._x000D_ ५. त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्य साधारणतः १.५ ते २ किलो बी पसरावे._x000D_ ६. अशा प्रकारे प्रति दुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी._x000D_ ७. हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत._x000D_ ८. एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात ते आठ वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी २०० लिटर पाणी लागते._x000D_ ९. चाऱ्याची ७ ते ८ दिवसांत वाढ होते. साधारणपणे एक किलो मक्‍यापासून १० किलो हिरवा चारा तयार होतो. हायड्रोपोनिक्‍स चाऱ्याचे फायदे: 1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय. 2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती. 3. जनावरांना ९० टक्के चारा पचतो. 4. पशुखाद्याचा खर्च ४० टक्के कमी. 5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. 6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ. 7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते. 8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ. अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ८ डिसे १७
26
0