AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हायरल जुगाडन्यूज १८ लोकमत
हात न लावता शेण उचलण्याचा अजब जुगाड!
➡️ शेतातलं प्रत्येक काम ठरावीक वेळेत आणि मेहनतीनं पूर्ण करावं लागतं. अनेक शेतकरी संशोधन वृत्ती जोपासून, शेतातली छोटी-मोठी कामं करण्यासाठी लहान-मोठी यंत्रं तयार करत आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या या यंत्रांची माहिती वेगानं पसरत असताना दिसते. इंटरनेट दुनियेत याला `देसी जुगाड असं संबोधलं जातं ➡️ हे जुगाड किंवा ट्रिक्स पाहून शेतकऱ्यांच्या कल्पकतेला नेटिझन्सकडून दाद मिळते. अन्य शेतकरीदेखील हे जुगाड वापरताना दिसतात. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात एक शेतकरी जनावरांचं शेण हात न लावता साफ करताना दिसत आहे. ➡️ मजूर टंचाईमुळे त्रस्त झालेले शेतकरी आता शेतीकामांसाठी काही ना काही ट्रिक्स शोधून काढू लागले आहेत. अशा ट्रिक्स वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या इंटरनेटवर अशाच एका ट्रिकचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात शेतकरी एका विशिष्ट तंत्राचा वापर करून शेणाला हात न लावता, स्वच्छता करताना दिसत आहे. ➡️ शेतात, गोठ्यात किंवा घराच्या अंगणात जनावरं असतील तर परिसराच्या साफसफाईचं काम शेतकऱ्याला करावं लागतं. यात श्रम आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो. व्हिडिओत दर्शवलेल्या देशी जुगाडामुळे आता शेणाला हात न लावता परिसराची स्वच्छता वेगाने करणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. ➡️ जनावरांचं शेण उचलण्यासाठी आणि गोठा स्वच्छ करण्यासाठी या शेतकऱ्यानं तयार केलेलं उपकरण सध्या विशेष चर्चेत आहे. यामुळे गोठ्याचा परिसर कमी वेळात स्वच्छ करता येणार आहे. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5