कृषि वार्तालोकमत
हवामान खात्याचे नवीन संकेतस्थळ
मुंबई: हवामान, वातावरण, भूकंप व चक्रीवादळाची माहिती देण्यासह अतिवृष्टीदरम्यान नागरिकांना सर्तक करण्याचे काम करणारे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे नवे संकेतस्थळ ऑगस्ट महिन्यात सेवेत दाखल होणार आहेत. केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या संकेस्थळावर उल्लेखनीय बदल केले जात आहेत. ऑगस्ट, २०१९ मध्ये भारतीय हवामान शास्त्र विभागाचे नवे संकेतस्थळ नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. ते हाताळण्यास अधिक सोपे असणार असून, संकेतस्थळावरील विविध माध्यमातून आवश्यक माहिती प्रत्येक गरजू घटकास दिली जाईल. दोन ते तीन महिन्यात सोशल मीडियावर मोठया प्रमाणात हवामानाविषयी नागरिकांना जागृत करण्यासाठी मोहिम राबविली जाईल. संदर्भ- लोकमत, २२ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
157
0
संबंधित लेख