AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अंदाज वर्तविण्याची क्षमती वाढली
कृषि वार्तालोकमत
हवामान अंदाज वर्तविण्याची क्षमती वाढली
मुंबई- आधुनिक प्रणालीचा वापर करत गेल्याने मागील काही वर्षात हवामानाचा अंदाज देण्याच्या क्षेत्राचे अंतर २०० किमीहून १२ किमीपर्यंत कमी करण्यात यश आले आहे. डॉपलर-रडारच्या मदतीने पुढील दोन तासांत कुठे, किती पाऊस पडेल, याचा अचूक अंदाज वर्तविण्यात येतो. हवामान खात्याच्या नियोजनात ‘मेगासिटी फोरकास्ट सिस्टिम’ असून यामुळे हवामानाचे अचूक अंदाज वर्तविण्यात हवामान खाते आणखी सक्षम होईल, असा विश्वास मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर भारतीय हवामान शास्त्र विभाग १८७५ सालापासून कार्यान्वित असून, १५० वर्षाच्या माहितीचा साठा हवामान खात्याकडे आहे, अशी माहिती कोणाकडेही नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. हवामान खाते देशभरात देशभरात ५५ डॉपलर रडार बसवत आहे. त्यातील २५ बसवली आहे. संदर्भ – लोकमत, १० ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
60
0