हळद व आले पिकामध्ये आंतरपीक घेताय? घ्या काळजी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हळद व आले पिकामध्ये आंतरपीक घेताय? घ्या काळजी!
🌱मुख्य पिकाशी स्पर्धा न करता हळद व आले पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करणार्‍या आंतरपिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही पिके हळद/ आले पिकापेक्षा उंचीने कमी तसेच पसार्‍याने कमी जागा व्यापणारी असावीत. हळद पिकाची लागवड केल्यापासून ३ ते ३.५ महिन्यांनी फुटवे येउन कंद पोसण्यास सुरुवात होते. त्यासाठी हळकुंड येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी होणे फायदेशीर ठरते, म्हणून हळद पिकामध्ये श्रावणघेवडा, मिरची, कोथिंबीर, कोबी, फुलकोबी व पालेभाज्या या पिकांची लागवड करावी. मका हे पीक हळदीमध्ये घेऊ नये. कारण मक्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये १५ ते २०% घट येते. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
0
इतर लेख