AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद बाजारात पुन्हा तेजी !
बाजार बातम्यालोकसत्ता
हळद बाजारात पुन्हा तेजी !
➡️हळदीच्या व्यापारावर पाच टक्के जीएसटी लागू केल्यानंतर सांगलीच्या बाजारात गेल्या आठवडय़ात उतरलेल्या हळदीच्या दराने क्विंटलमागे तब्बल ३ हजार ८५० रुपयांची उसळी घेतली आहे. ➡️बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये हळदीला १८ हजार रुपयांचा सर्वोच्च दर मिळाल्याचे बाजार समितीचे अध्यक्ष यांनी सांगितले. ➡️हळद शेतमाल नसल्याचा दावा करीत महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने डिसेंबरच्या अंतिम आठवडय़ामध्ये जाहीर केला होता. यामुळे धास्तावलेल्या बाजारात हळदीचे दर क्विंटलमागे तब्बल अठराशे रुपयाने खाली उतरले होते. ➡️गेल्या आठ दिवसांत हळदीचे दर स्थिर राहिले असले तरी कमीच होते. मात्र, गेल्या हंगामातील हळद विक्री अंतिम टप्प्यात आली असताना आणि नवीन हंगामातील हळद आणखी दोन आठवडय़ांनी बाजारात येण्याची चिन्हे दिसत असल्याने बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये हळदीची मागणी एकदम वाढली. ➡️यामुळे सरासरी दरामध्ये ३ हजार ८५० रुपयांनी वाढ झाली. आज झालेल्या सौद्यामध्ये विजय उर्फ संभाजी चव्हाण या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला क्विंटलमागे तब्बल १८ हजार रुपयांचा दर मिळाला. ➡️आजच्या सौद्यामध्ये हळदीला किमान सहा हजार ते कमाल १८ हजार रुपये असा दर मिळाला असून हळदीचा सरासरी दर १२ हजार रुपये राहिला आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या सौद्यामध्ये कमाल दर ११ हजार ३०० रुपये तर किमान दर पाच हजार होता. संदर्भ:-Loksatta हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
5
इतर लेख