AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद पिकातील 'करपा' रोगावर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हळद पिकातील 'करपा' रोगावर उपाययोजना!
➡️ हा रोग दोन प्रकारच्या बुरशींमुळे होतो. १. कोलॅटोट्रीकम कॅपसीसी व २. टॅफरीन मॅक्युलन्स. पहिल्या प्रकारच्या बुरशीमुळे ठिपक्यांचे आकार लंब गोलाकार असून वेगवेगळ्या आकाराचे दिसून येतात. ठिपक्यांचा मध्यभाग पांढरट जांभळ्या रंगाचा असून कडेने विटकरी रंगाचे ठिपके दिसून येतात. ➡️ हे ठिपके एकमेकांत मिसळून वाढत जावून संपूर्ण पान वाळून जाते. दुस-या प्रकारात पानांच्या वरच्या पृष्ठभागावर असंख्य लहान, गोलाकार किंवा ता-यांसारखे लाल ठिपके तयार होतात. ➡️ ठिपक्यांच्या मध्यभागी बुरशीची काळी वर्तुळाकार फळे रचल्यासारखी दिसतात. नंतरच्या काळात ठिपक्यांच्या सभोवताली पिवळी कडा तयार होते. असंख्य ठिपके तयार होत असल्यामुळे संपूर्ण पान लाल रंगाचे होवून वाळून जाते. ➡️ यामुळे पानांमध्ये अन्न तयार करण्याच्या क्रियेत अडथळा येतो व याचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी अझोक्झिस्ट्रोबीन १८.२% + डायफेंकोनॅझोल ११.४% एससी @१ मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
17
इतर लेख