AgroStar
हळद पिकाच्या लागवडी विषयक महत्वाची माहिती!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद पिकाच्या लागवडी विषयक महत्वाची माहिती!
• हळद हे महाराष्ट्रातील इतर प्रमुख पिकांसोबतच महत्वाचे नगदी मसाल्याचे पीक आहे. वैद्यकीय, धार्मिक, सौंदर्य प्रसाधने अश्या अनेक ठिकाणी हळदीचा वापर केला जातो. • हळदीची लागवड हि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करावी. मध्यम प्रतीची, काळी, पोयटाची तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागवडीसाठी योग्य आहे. हळदीसाठी उष्ण दमट वातावरण तसेच मध्यम पाऊस व चांगला सूर्यप्रकाश मानवते. • जमिनीची मशागत करताना उन्हाळ्यात एक खोलगट नांगरणी तसेच वखरणी करून घ्यावी व त्याच वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकावे. ठिबक वर लागवड करणार असल्यास लागवडीसाठी 1 मीटर रुंदीचा, 20 ते 25 सेंटी. उंच गादीवाफा तयार करून त्यामध्ये निंबोळी पेंड व इतर रासायनिक खतांची मात्रा टाकावी. त्यानंतर बेड वर ड्रीप टाकून 30*30 सेंटीमीटर अंतरावर हळदीच्या बेण्याची लागवड करावी. • हळद पिकाच्या बेण्याच्या लागवडीसाठी निरोगी तसेच 25 ते 30 ग्रॅम वजनाचे मातृकंदापासुन तयार केले बेणे निवडावे. लागवडीसाठी सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले स्वरूपा, टेकापुरी यांसारख्या वाणांची निवड करावी. एकरी साधारतः 8 ते 10 क्विंटल बेणे वापरावे. • कंदाच्या चांगल्या उगवणीसाठी, जोमदार वाढीसाठी तसेच कीड व रोग यांपासून सुरुवातीच्या काळात संरक्षण होण्यासाठी बेणे प्रक्रिया करणे गरजेचे आहे. यासाठी 13:00:45 हे विद्राव्ये खत 10 ग्रॅम, क्विनॉलफॉस 25% ईसी घटक असलेले कीटकनाशक 2 मिली व कार्बेन्डाझिम घटक असलेले बुरशीनाशक 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून कंद लागवडीपूर्वी 15 मिनिटे बुडवावी. • तसेच लागवडी नंतर पिकात पाण्याचे खतांचे योग्य व्यवस्थापन करून वेळीच करपा, कंद कूज, कंद माशी यांचे नियोजन करावे. अन्नद्रव्ये व्यवस्थापन करताना सुरुवातीलाच सल्फर हे दुय्यम तसेच फेरस हे सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा प्रामुख्याने समावेश करावा. जेणेकरून पिवळेपणा कि समस्या पिकात येणार नाही. • हळद पीक आंतरपीक पीक घ्यावयाचे असल्यास त्यासाठी कमी कालावधीच्या तसेच हळद पिकाशी स्पर्धा न करणाऱ्या पिकांची लागवड करावी. यासाठी मेथी, कोथिंबीर, फरशी शेंग, घेवडा यांसारख्या पिकांची निवड करावी. वरील पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच हळद पिकाच्या उत्पादनात भर पडेल. संबंधित उत्पादने AGS-CP-702 AGS-CP-191 AGS-CN-447 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
5
इतर लेख