गुरु ज्ञानAgrostar
हळद आणि आले पिकातील कंदमाशी नियंत्रण
🌱योग्य वेळेत पाऊस न होणे म्हणजेच लांबलेला पावसाळा कंदमाशीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल असतो. हळद आणि आले पिकामध्ये कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ अथवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. 5 ते 7 दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडून कंदामध्ये शिरतात. अळ्यांचा शिरकाव कंदामध्ये झाल्याने तिथे रोगकारक बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कूज होण्यास सुरुवात होते. नियंत्रणासाठी Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC घटक असणारे अरेक्स-505 कीटकनाशक @1 लिटर प्रति एकर व Thiamethoxam 75% SG घटक असणारे शटर कीटकनाशक @100 ग्रॅम प्रति एकर यांची एकत्रीत आळवणी अथवा ड्रीप च्या माध्यमातून वापर करावा.
🌱संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.